मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईकरांसाठी एक खास बातमी दिली आहे. आता बेलापूर आणि नेरुळमधून उरणला जाण्यासाठी लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ही माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावरून दिली.
अनेक दिवसांपासून उरण येथील नागरिकांकडून लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी होत होती. या मागणीला आता यश आले आहे. नेरुळ ऊरण-नेरुळ (4 फेऱ्या) व बेलापूर-ऊरण-बेलापूर (6 फेऱ्या) या अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच तारघर व गव्हाण येथे स्टेशन मंजूर करण्यात आले आहेत.
“मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी माझ्या निवेदनाला मान देत, नेरुळ-ऊरण-नेरुळ (4 फेऱ्या) आणि बेलापूर-ऊरण-बेलापूर (6 फेऱ्या) या अतिरिक्त लोकल सेवा सुरू केल्याबद्दल तसेच तारघर आणि गव्हाण येथे स्टेशन मंजूर केल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार! या निर्णयामुळे मुंबईकरांचा रोजच्या प्रवासातील मोठा त्रास कमी होईल आणि नवी मुंबई व आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
Leave a Reply