“मी माझ्या बहिणींना सांगतो की, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, “राज्यात आम्हाला मोठा विजय मिळाल्यानंतर विरोधकांनी आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होणार म्हणून नरेटीव्ह पसरवले. परंतु विरोधकांच्या नाकावर टिच्चून एक वर्ष झाले तरी सर्व योजनांचे पैसे सुरू आहेत. लाडकी बहीण योजना, शेतीला मोफत वीज, पिक विमा, तसेच शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय सरकार कधीच बंद करणार नाही. आम्ही निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणारे लोक नाही तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे लोक आहोत,” असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
Leave a Reply