मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याने सौर ऊर्जा क्षेत्रात नवा मैलाचा दगड गाठत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अल्पावधीत उभारण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील सौर कृषिपंप प्रकल्पांमुळे ही अभूतपूर्व कामगिरी साध्य झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
राज्य सरकारच्या MSEDCL आणि Magel Tyala Solar Krushi Pump Yojana (MTSKPY) अंतर्गत एकाच महिन्यात रेकॉर्ड ब्रेक सौर पंप बसवले गेले आहेत. मागील महिन्यात 27 ऑक्टोबर पासून ते 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत तब्बल 45,911 सौर कृषी पंप बसवणे पूर्ण झाले. ज्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये महाराष्ट्राची नोंद करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे लाखो शेतकऱ्यांना दिवसा अखंड व मोफत सौरऊर्जेवर चालणारे पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या रेकॉर्डमुळे महाराष्ट्र देशातील सौर ऊर्जेचा अग्रगण्य राज्य म्हणून ठळकपणे समोर आले आहे. ग्रीन एनर्जीचा प्रसार, कार्बन उत्सर्जनात घट आणि शेतीला शाश्वत ऊर्जा पुरवठा यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या धोरणांचे हे मोठे यश मानले जात आहे. सौरऊर्जा विस्ताराच्या पुढील टप्प्यांमध्ये आणखी मोठे प्रकल्प, ग्रामीण भागात स्मार्ट ऊर्जा व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या योजना जाहीर करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे.
Leave a Reply