मुंबई : धारावीच्या पुनर्विकासाबाबत नागरिकांना सविस्तर माहिती मिळावी, यासाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात देवाभाऊ यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून धारावीच्या प्रस्तावित पुनर्विकासाचे स्वरूप नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.
धारावी ही केवळ निवासी वस्ती नसून मोठे आर्थिक केंद्र असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. कुंभारवाड्यातील मातीभांड्यांचा व्यवसाय, चर्मोद्योग, अन्नप्रक्रिया आणि प्लास्टिक पुनर्चक्रण यांसारख्या उद्योगांनी धारावीची स्वतंत्र आर्थिक ओळख निर्माण केली आहे. या व्यवसायांचे महत्त्व जपत व्यावसायिकांना नियोजित जागा उपलब्ध करून देण्याचा पुनर्विकास आराखड्यात विचार असल्याचे देवाभाऊंनी सांगितले.
एक्सपिरियन्स सेंटरमध्ये नागरिकांना भविष्यातील घरे, परिसर आणि कामाच्या ठिकाणांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे पुनर्विकासाबाबतचे संभ्रम दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी गायक शंकर महादेवन यांच्या ‘धारावी का कल’ या विशेष गीताचे अनावरण आणि ‘मेरे सपनों की धारावी’ पुस्तकाचे प्रकाशनही देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आले.












Leave a Reply