ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त करत नानांसोबतच्या आपल्या जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा दिला.
नानांच्या निधनाची माहिती मिळताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांच्याशी फोनवरून संवाद साधत शोकसंवेदना व्यक्त केल्या. “नाना माझ्यासाठी एखाद्या भावासारखे, मार्गदर्शकासारखे आणि मित्रासारखे होते. त्यांची उणीव सर्वांनाच भासेल,” असे फडणवीस म्हणाले.

‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ या प्रवासात नानांनी कसदार अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली. मात्र, पडद्याबाहेरही ते संवेदनशील समाजसेवक म्हणून कार्यरत होते. जलयुक्त शिवार अभियानाला त्यांनी दिलेला पाठिंबा, तसेच मकरंद अनासपुरेंसोबत ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त आणि शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
“नानांचे कार्य आपण कायम पुढे ठेवू. सरकार कायम आपल्यासोबत असेल,” असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. नानांच्या निधनाने देशभक्त, समाजसेवक आणि उत्तम कलाकार आपण गमावला असल्याचे सांगत त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply