मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने प्रशासनात महत्त्वाचे फेरबदल करत अनेक वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिपेंद्र सिंह कुशवाह यांची एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, अश्विन मुगल यांची सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी, तर अश्विनी जोशी यांची एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय कादंबरी बलकवडे यांची विकास आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना अधिक गती देण्यासाठी हा प्रशासकीय फेरबदल महत्त्वाचा मानला जात आहे.













Leave a Reply