मुंबईत गेल्या चार दिवसांत एका महिन्याइतका पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात आढावा घेतल्यानंतर त्यांनी राज्यातील पावसाच्या परिस्थितीची माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईत दुपारी समुद्राला भरती येणार असून त्याचवेळी मुसळधार पाऊस झाल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच 60 ते 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ अभूतपूर्व पावसामुळे सुमारे 100 टन मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यापैकी 70 टन माती हटवण्यात आली असून उर्वरित ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरही आठ ठिकाणी दरडी कोसळल्या असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत.राज्यातील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता 8 जुलैपर्यंत विशेष सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.











Leave a Reply