मुंबई – पुणे मिसिंग लिंक प्रकल्पावरील वाद विधानसभेत पुन्हा ऐरणीवर आला. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला होता, परंतु विद्यमान सरकारने तो पूर्णत्वास नेल्याचा दावा केला. पूर्वीच्या सरकारने सुरक्षेसह विविध कारणांचा उल्लेख करून प्रकल्पाला स्थगिती दिली होती, असे त्यांनी सांगितले.
कोकण रेल्वेच्या उभारणीचा दाखला देत, कठीण भौगोलिक परिस्थितीतही पायाभूत सुविधा उभ्या राहू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मिसिंग लिंकमुळे अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून महत्त्वाचे बोगदे व पूल साकार झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
भाषणादरम्यान फडणवीस यांनी वैयक्तिक टीकेबाबत आपल्याला आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, राजकीय आरोपांच्या निमित्ताने राज्याची प्रतिमा धुळीस मिळविण्याचा प्रयत्न झाल्यास त्यास ठामपणे विरोध केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. या वक्तव्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ चांगलेच तापले.











Leave a Reply