“महाराष्ट्राची ओळख मुंबईसोबत आता फडणवीसांच्या नेतृत्वानेही!”; अमेरिकेच्या राजदूतांचं मोठं कौतुक

महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जाहीर व्यासपीठावरून केलेलं कौतुक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईतील मेडिसिटी प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार आणि अमेरिकेतील क्लिव्हलँड क्लिनिक यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्जिओ गोर उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना सर्जिओ गोर यांनी महाराष्ट्राचा उल्लेख करताना म्हटलं की, आज महाराष्ट्राची जगभरात ओळख निर्माण होण्यामागे दोन प्रमुख कारणं आहेत. मुंबई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फडणवीस हे गतिमान, प्रचंड ऊर्जा असलेले आणि आपल्या कामाबद्दल आस्थावान नेते असल्याचंही त्यांनी नमूद केलं. विशेष म्हणजे, हे कौतुक एखाद्या व्यावसायिक किंवा राजकीय समर्थकाकडून नव्हे, तर भारतातील अमेरिकेच्या राजदूतांकडून झाल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील हालचालींमुळे त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील भूमिकेबाबतही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे अमेरिकन राजदूतांचं हे विधान फडणवीसांच्या नेतृत्वाच्या चर्चेला आणखी बळ देणारं ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *