पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात आज उबाठा गटाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळात आमदार अनिल परब, सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांच्यासह मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा समावेश होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच विधानभवनात मुंबईतील सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकास प्रकल्पांचा आढावा मांडला होता. त्यानंतर या प्रकल्पांसह शहरातील प्रलंबित प्रश्न, पावसाळ्यात निर्माण झालेल्या अडचणी आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे.
बैठकीदरम्यान शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असले, तरी सध्या या चर्चेचा केंद्रबिंदू मुंबईच्या विकासकामांशी संबंधित मुद्दे असल्याचे स्पष्ट होत आहे.











Leave a Reply