गोकुळवर शासकीय संचालक नेमण्यामागचं कारण काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा!

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील संचालक निवडीवरून राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली आहे. गोकुळमध्ये अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेलं 14 सदस्यांचं संख्याबळ कोणत्याही गटाकडे नसल्याने पेच निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने चार शासकीय संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

नागपुरात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 25 पैकी 13 जागा जिंकूनही काँग्रेसच्या समविचारी आघाडीला अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक कोरम पूर्ण करता येत नव्हता. बैठकही संख्याबळाअभावी रद्द करावी लागली. आणखी बैठका निष्फळ ठरल्या असत्या तर निवडणूकच रद्द करण्याची वेळ आली असती. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला.

या निर्णयासाठी महाधिवक्त्यांचं मत विचारात घेतल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, गोकुळच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी केलेल्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *