मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांसोबत वर्षा निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक घेत सोशल मीडियावरील सक्रियतेबाबत स्पष्ट भूमिका मांडली. प्रत्येक आमदाराच्या सोशल मीडिया कामगिरीचा अहवाल सादर करत जनतेशी सातत्याने संवाद साधणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती सोशल मीडियाद्वारे किती प्रभावीपणे पोहोचवली जाते, वरिष्ठ नेत्यांच्या पोस्टला किती प्रतिसाद दिला जातो आणि मतदारांशी डिजिटल माध्यमातून किती संपर्क ठेवला जातो, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सोशल मीडिया हे केवळ प्रसिद्धीचे व्यासपीठ नसून जनतेशी थेट जोडणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे या माध्यमात निष्क्रिय राहणाऱ्या आमदारांची यापुढे गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.













Leave a Reply