स्टार्टअपच्या आघाडीत महाराष्ट्र अव्वल; मुंबईकडे जागतिक गुंतवणुकीचे लक्ष

पणजी : महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला नवउद्योजकतेची मजबूत साथ मिळत असून, 33 हजार 872 स्टार्टअप्ससह राज्याने देशात आघाडीचे स्थान कायम ठेवले आहे. मुंबई ही जागतिक भांडवल आणि गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने विकसित होत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नमूद केले.

पणजी येथे झालेल्या पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या 28व्या बैठकीत शाह यांनी पश्चिम भारताच्या आर्थिक विकासातील महाराष्ट्राच्या योगदानाचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत स्टार्टअप, वित्तीय सेवा, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रातील महाराष्ट्राची वाढ अधोरेखित करण्यात आली.

दरम्यान, 2014 नंतर प्रादेशिक परिषदांच्या कामालाही मोठी गती मिळाल्याचे शाह यांनी सांगितले. 2014 पासून आतापर्यंत परिषद आणि स्थायी समित्यांच्या 71 बैठका झाल्या असून, 1893 विषयांवर चर्चा करत 1445 मुद्दे निकाली काढण्यात आले आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिषदांचे कार्य आता विकास आणि जनकल्याणाच्या अंमलबजावणीसाठी अधिक प्रभावी माध्यम ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *